वाक्पचार व अर्थ यांची जोडी असणाऱ्या पर्यायास स्पर्श करा

Welcome to your TET - मानसशास्त्र - अध्यापन पद्धती 2

प्र1.खालीलपैकी कोणता पर्याय ‘चिंतन स्तर’ (Reflective Level of Teaching) सर्वात अचूकपणे दर्शवतो? A) शिक्षक विद्यार्थ्यांना संकल्पना समजावून सांगतो व शेवटी प्रश्न विचारतो B) विद्यार्थी उदाहरणांवरून नियम शोधतात पण त्यावर टीकात्मक चर्चा होत नाही C) विद्यार्थी समस्येचे विश्लेषण करून विविध पर्यायांची तुलना करून योग्य निष्कर्ष काढतात D) विद्यार्थी केवळ दिलेले उत्तर आठवून लिहितात

2.‘समस्या निराकरण पद्धती’मध्ये योग्य क्रम कोणता? A) उपाय → समस्या ओळख → निष्कर्ष B) समस्या ओळख → माहिती संकलन → उपाय निवड → निष्कर्ष C) निष्कर्ष → समस्या → उपाय D) माहिती संकलन → समस्या → निष्कर्ष

3.एका वर्गात शिक्षक विद्यार्थ्यांना गटात विभागतो, त्यांना प्रत्यक्ष समस्या देतो, माहिती गोळा करायला सांगतो, उपाय सुचवायला सांगतो व शेवटी निष्कर्ष मांडायला लावतो. ही पद्धती कोणती?

4.योग्य - जोडी ओळखा. A) डॉल्टन पद्धती – वैयक्तिक गतीने शिक्षण B) प्रयोगशाळा पद्धती – निरीक्षणावर भर, प्रयोग नाही C) दिग्दर्शन पद्धती – शिक्षक प्रयोग करून दाखवतो D) सांघिक अध्यापन – एकच शिक्षक

5. खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी बरोबर विधाने ओळखा. (1) आधार पद्धतीत विद्यार्थ्यांना ऐतिहासिक सत्य पटवून देण्यासाठी प्राथमिक व दुय्यम स्रोतांचा उपयोग केला जातो, ज्यामुळे त्यांच्या ज्ञानाची विश्वासार्हता वाढते. (2) प्राथमिक आधारांमध्ये शिलालेख, नाणी, वास्तू यांचा समावेश होतो, तर दुय्यम आधारांमध्ये पुस्तके व लेखन साहित्य येते. (3) आधार पद्धतीत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव मिळत नसल्यामुळे ती कमी प्रभावी ठरते.

6. खालील विधाने विचारात घ्या. त्यापैकी बरोबर विधाने ओळखा. (1) चर्चा पद्धतीमध्ये विषय निवड, गट विभागणी, चर्चा व मूल्यमापन हे टप्पे असतात. (2) चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांना स्वतःचे मत मांडण्याची संधी मिळत नाही. (3) ही पद्धती विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती कौशल्याचा विकास करते.

7.खालील विधानांचा विचार करा व चुकीचे विधान निवडा. (1) संश्लेषण पद्धतीत भागांपासून संपूर्ण रचना तयार केली जाते. (2) विश्लेषण पद्धतीत संपूर्ण गोष्टीचे भाग केले जातात. (3) दोन्ही पद्धती एकमेकांच्या पूरक आहेत. (4) या पद्धतींचा वापर केवळ गणित विषयात होतो.

8.खालील विधानांचा विचार करा. त्यातील चुकीची विधाने निवडा. (1) प्रकल्प पद्धतीत विद्यार्थ्यांना वास्तव जीवनाशी संबंधित समस्या किंवा कार्य दिले जाते, ज्यामध्ये ते नियोजन, अंमलबजावणी व मूल्यमापन या सर्व टप्प्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतात. (2) या पद्धतीत शिक्षकाचे मुख्य कार्य केवळ माहिती देणे असून विद्यार्थ्यांच्या कामात हस्तक्षेप केला जात नाही. (3) प्रकल्प पद्धती विद्यार्थ्यांमध्ये सहकार्य, जबाबदारी व स्वावलंबन विकसित करते. (4) या पद्धतीत विद्यार्थ्यांना निश्चित पाठ्यपुस्तकापुरतेच मर्यादित ठेवले जाते.

9. खालील विधाने पहा. चुकीचे विधान ओळखा. (1) चर्चा पद्धतीत द्विमार्गी संवाद असतो, तर व्याख्यान पद्धतीत एकमार्गी संवाद असतो. (2) चर्चा पद्धतीत विद्यार्थ्यांचा सहभाग कमी असतो, तर व्याख्यानात जास्त असतो. (3) व्याख्यान पद्धती वेळेची बचत करते, तर चर्चा पद्धती वेळखाऊ असते. (4) चर्चा पद्धतीत उच्चस्तरीय विचार विकसित होतो, तर व्याख्यान पद्धतीत मुख्यतः स्मृती स्तरावर भर असतो.

10 खालील पैकी बरोबर विधाने ओळखा. (1) प्रकल्प पद्धतीत विद्यार्थ्यांना वास्तव जीवनाशी संबंधित कार्य दिले जाते व ते नियोजन, अंमलबजावणी व मूल्यांकन या सर्व टप्प्यांमध्ये सहभागी होतात. (2) डॉल्टन पद्धतीत सर्व विद्यार्थ्यांना समान गतीने शिक्षण दिले जाते. (3) स्वयंशोधन पद्धती विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग व निरीक्षण करून ज्ञान मिळवण्यास प्रवृत्त करते. (4) समस्या निराकरण पद्धतीत शिक्षक विद्यार्थ्यांना थेट अंतिम उत्तर देतो.