TET – मानसशास्त्र | संवेदना आणि अवबोध (Sensation & Perception)
TET परीक्षेसाठी उपयुक्त संपूर्ण मार्गदर्शक
1. प्रस्तावना
मानवाला बाह्य जगातून विविध अनुभव मिळतात. त्या अनुभवांमधून शिकणे घडते आणि पुढे विचार प्रक्रिया विकसित होते. या संपूर्ण प्रक्रियेत संवेदना आणि अवबोध यांचा महत्त्वाचा सहभाग असतो.
- • अनुभव → शिकणे → विचार प्रक्रिया
2. संवेदना (Sensation)
संवेदना म्हणजे बाह्य उद्दीपकांची प्राथमिक जाणीव होय. ही एक साधी आणि अर्थरहित मानसिक प्रक्रिया असते.
- • ही प्रक्रिया ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून होते
- • संवेदना शुद्ध असते
- • त्यात अर्थ नसतो
3. संवेदना निर्माण होण्याची प्रक्रिया
उद्दीपकापासून संवेदना तयार होण्यासाठी पुढील टप्पे महत्त्वाचे असतात:
- • उद्दीपक → ज्ञानेंद्रिय → मज्जासंस्था → संवेदना
- • संवेदना निर्माण होण्यासाठी इच्छा आवश्यक नसते
4. संवेदनक्षमता
- • प्रत्येक व्यक्तीची संवेदनक्षमता वेगळी असते
- • ती ज्ञानेंद्रियांच्या क्षमतेवर अवलंबून असते
- • विविध प्राण्यांमध्येही संवेदनक्षमता भिन्न असते
5. अवबोध (Perception)
संवेदनांना जेव्हा अर्थ प्राप्त होतो तेव्हा त्या प्रक्रियेला अवबोध म्हणतात.
- • संवेदना + अर्थ = अवबोध
- • अवबोध – अर्थ = संवेदना
6. संवेदना व अवबोध यांतील फरक
| संवेदना | अवबोध |
|---|---|
| प्राथमिक पायरी | पुढील पायरी |
| अर्थरहित | अर्थपूर्ण |
| साधी जाणीव | समज |
7. गेस्टाल्ट नियम
- • समीपता: जवळ असलेल्या वस्तू एकत्र दिसतात
- • साधर्म्य: समान गुणधर्म असलेल्या वस्तू एक गट वाटतात
- • सातत्य: सलगपणा जाणवतो
- • पूर्णत्व: अपूर्ण गोष्ट पूर्ण वाटते
8. आकृती व पार्श्वभूमी
- • आकृती: ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित होते
- • पार्श्वभूमी: इतर कमी लक्षवेधी भाग
- • आकृती व पार्श्वभूमी बदलू शकतात
उदाहरण: फळा लक्षवेधी असेल तर तो आकृती ठरतो आणि वर्गातील इतर वस्तू पार्श्वभूमी ठरतात.
9. अवबोधातील दोष
इंद्रियभ्रम
- • उद्दीपक असतो पण त्याचा चुकीचा अर्थ लावला जातो
चित्तभ्रम
- • उद्दीपक नसताना भास होतो
- • मानसिक स्थितीशी संबंधित असतो
10. मनाचा कल
- • पूर्वानुभवामुळे अवबोधावर परिणाम होतो
- • व्यक्तीची अपेक्षा आणि विचार महत्त्वाचे असतात
11. शैक्षणिक महत्त्व
- • अनुभवाधारित शिक्षण महत्त्वाचे आहे
- • ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर करावा
- • स्पष्ट आणि सुव्यवस्थित मांडणी करावी
- • पूर्वग्रह टाळावेत
व्हिडिओ स्पष्टीकरण
सराव प्रश्नमंजुषा
संकल्पना व निर्मिती: Funlearnhub.in | श्री. वाल्मीक जगन्नाथ हिंगे, नाशिक

Very good