1.खालीलपैकी योग्य विधान / विधाने कोणते/कोणती? अ) निजामशहाने शहाजीराजांना ‘सरलष्कर’ हा किताब दिला होता ब) निजामशहाने शहाजीराजांना बंगळूरची जहागिरी बक्षीस दिली होती.
2.छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता?
3.छत्रपती शिवाजी महाराज : शिवनेरी :: समर्थ रामदास : ?
4.‘शिवराय आपल्या सेवकांची / सहकाऱ्यांची पित्या सारखी काळजी घेत’. या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देणार नाहीत?
5.शिवरायांच्या काळात ‘बारगीर’ हे संबोधन / पद कोणत्या सैन्यदळाशी संबंधित आहे?
6.‘कर्तव्यापुढे शिवराय नात्यागोते मानत नसत.’ या वाक्याशी संबंधित स्पष्टीकरण देताना विद्यार्थ्यांना शिक्षक कोणाचा दाखला देतील?
7.स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्याविरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामीनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी खालील पर्यायांपैकी कोणती ?
8.मुरुंबदेवचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांची छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे कोणती नावे नव्याने दिली ?
9. खालील वैशिष्ट्ये कोणत्या किल्ल्याची आहेत? 1. पुण्याच्या नैऋत्येला कानद खोऱ्यात हा किल्ला आहे. 2. शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नाव प्रचंडगड ठेवले.
10. आज्ञापत्र हा ग्रंथ कोणी लिहिला असे मानले जाते?