इयत्ता 8 वी गणित : वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² कसे येते? (Activity सह स्पष्टीकरण)
गणितामध्ये आपण वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² हे सूत्र शिकतो.
परंतु अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की हे सूत्र कसे तयार झाले?
फक्त सूत्र पाठ करण्याऐवजी त्यामागील संकल्पना समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे.
या व्हिडिओमध्ये वर्तुळाचे समान भाग करून ते वेगळ्या पद्धतीने मांडल्यास आयतासारखी आकृती तयार होते आणि त्यावरून वर्तुळाचे क्षेत्रफळ πr² कसे मिळते हे सोप्या Activity च्या मदतीने समजावून सांगितले आहे.
Video पहा.
Activity मधून काय समजते?
या कृतीमध्ये पुढील टप्पे दाखवले आहेत :
1.वर्तुळाचे अनेक समान भाग केले.
2. हे भाग एक आड एक मांडले.
3️⃣ त्यामुळे जवळजवळ आयतासारखी आकृती तयार होते.
आता क्षेत्रफळ काढू
या आयताची
लांबी ≈ πr
रुंदी = r
म्हणून
आयताचे क्षेत्रफळ = लांबी × रुंदी
= πr × r
= πr²
म्हणून
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr²
हा व्हिडिओ कोणासाठी उपयुक्त?
✔ इयत्ता 8 वी विद्यार्थी
✔ गणिताची संकल्पना समजून घेणारे विद्यार्थी
✔ शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी
📚 अशाच सोप्या गणित संकल्पना शिकण्यासाठी Funlearnhub ला भेट देत रहा.